पुणे

कुरुळीत मुंगूस समोर आल्याने बचावल्या सासू-सुना

CD

आंधळगाव, ता. १३ : कुरुळी (ता. शिरूर) येथे उसात दबा धरून बसलेला बिबट्या झडप घालण्याच्या तयारीत असताना अचानक त्याच्यासमोर मुंगुस आल्याने शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई कुतवळ (सासू) व पत्नी राजश्री कुतवळ (सून) बचावल्या आहेत. गुरुवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
मांडवगण फराटा हद्दीतील घाडगेतळई येथे व्यायामाला जात असलेल्या दोन महिला बिबट्याच्या हल्ल्यात बचावल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कुरुळी येथे घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व महिला मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार महिलांच्या समोर घडल्याने त्या भयभीत होऊन त्यांनी आरडाओरडा सुरू केला. राहुल कुतवळ यांनी याबाबत पोलिस पाटील संदीप पवार यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांत बिबट्याच्या हल्ला सत्राने नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT