पुणे

नागरगावात मोटार उलटूनही कोल्हापूरचे भाविक सुखरूप

CD

आंधळगाव, ता. २७ : न्हावरे- चौफुला महामार्गांवर नागरगाव (ता. शिरूर) येथील रांजणगाव फाटा येथे भीमा नदीच्या पुलाजवळ सूचना फलक नसल्याने अपूर्ण रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने भरधाव मोटार खड्ड्यात उलटली. सोमवारी (ता. २६) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात मोटारीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने मोटारीतील चार प्रवासी हे थोडक्यात बचावले.
कोल्हापूर येथील एक दांपत्य हे आपल्या कुटुंबासह मोटारीने (क्र. एम.एच ०९ बी.एक्स. ०९९२) नाशिक येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपून ते शिरूरमार्गे पुन्हा कोल्हापूरकडे जात होते. यावेळी नागरगाव येथे भीमा नदीच्या पुलाजवळ रस्त्यावर काम सुरु असल्याबाबत कुठलेही फलक लावलेले नव्हते. रस्त्याचे अपूर्ण काम वाहनचालकाच्या लक्षात आले न आल्याने भरधाव मोटार खोल खड्ड्यात कोसळली. यावेळी मोटार दोन- तीन पलट्या मारत रस्त्यावर उलटली. या मोटारीत दोन पुरुष व दोन महिला प्रवास करत होते. एवढा भीषण अपघात होऊनही सुदैवाने चार जण या अपघातातून बचावले आहेत.

अपूर्ण कामामुळे अपघात
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे सातत्याने येथे अपघात होत असून, ठेकेदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. न्हावरे ते रांजणगाव फाटा परिसरात ठिकठिकाणी या रस्त्याचे काम अजूनही प्रलंबित आहे. अपूर्ण असलेले काम अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT