आंधळगाव, ता. ११ : भरधाव पीकअपच्या धडकेत सुपर कॅरी वाहनातील व्यक्तीचा मृत्यू झाला. न्हावरे-चौफुला राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव (ता. शिरूर) येथील सीएनजी पंपासमोर सोमवारी (ता. २) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नंदकुमार काळुराम रसाळ (वय ५८, रा. नागरगाव, ता. शिरूर), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत सखाराम परसराम शेलार (रा. नागरगाव) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते नंदकुमार रसाळ यांच्यासह सोमवारी न्हावरे-चौफुला रस्त्यावरून आपल्या सुपर कॅरी वाहनातून जात होते. यावेळी आंधळगाव येथील सी.एन.जी. पंपाजवळ रस्ता ओलांडत असताना न्हावरे बाजूकडून येणाऱ्या पिकअपची (क्र. एम.एच.१२ एन.एक्स.१२१०) त्यांच्या सुपर कॅरी गाडीला (क्र. एम.एच १२ व्ही.टी.३८६२) जोरात धडक बसली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच, या वाहनातील नंदकुमार रसाळ हे गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना केडगाव येथील दवाखान्यात दाखल केले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजेंद्र गंगाधर बीडगर (रा. न्हावरे, ता. शिरूर) या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.