मांडवगण फराटा, ता.२१ : चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गावोगावी ग्रामसुरक्षा यंत्रणा, ग्रामसुरक्षा दल तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असून यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे मत शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी व्यक्त केले. शिरूर तालुक्यात दरोडे, जबरी चोरी व घरफोड्या आदी गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा पोलिस ठाण्यांतर्गत परिसरातील पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
केंजळे पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. ग्रामसूरक्षा यंत्रणा कार्यान्वित असलेल्या गावात ८० टक्क्याहून अधिक गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांच्याद्वारे गावामध्ये टप्प्याटप्प्याने रात्रीच्या वेळी ग्रस्त ठेवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून चोरीच्या घटना होणार नाहीत. त्याचबरोबर गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत उपाययोजना कराव्यात. व्यापारी वर्गाने दुकानांमध्ये कॅमेरा बसविताना तो बाहेरील बाजूस बसवावा, जेणेकरून त्यामध्ये रस्त्यावरील हालचाली कैद होतील. हे कॅमेरे नाईट व्हीजन असलेले असावेत. या सर्व कामांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत, सामाजिक संस्थानी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वडगाव रासाईचे पोलिस पाटील उत्तम शेलार, आंधळगावच्या पोलिस पाटील उर्मिला कुसेकर, मीना पाडळे, दिव्या कारकूड, माऊली सोनवणे, सुनील खांडेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.