पुणे

मांडवगण येथे घरात घुसून युवकावर प्राणघातक हल्ला

CD

मांडवगण फराटा, ता.१८ : जेवण करत असलेल्या कुटुंबाच्या घरात घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी १९ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे बुधवारी (ता. १६) रात्री घडली.
हल्ल्यातील प्रज्वल दिगंबर पवार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रज्वलची आई राजश्री दिगंबर पवार (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल हा आई वडिलांसोबत जेवण करत होते. यावेळी अंदाजे ३० वर्षे वयाचे दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या स्वयंपाक घराच्या दरवाज्याजवळ आले.त्यापैकी एकाच्या हातात बंदुकीसारखे हत्यार तर दुसऱ्याच्या हातात धारदार शस्त्र होते. या अनोळखी व्यक्तींना पाहून पवार दाम्पत्याने आरडाओरड केला. त्याचवेळी दरवाज्याकडे पाठ करून बसलेला प्रज्वल उठून उभा राहिला आणि त्या दिशेने गेला. त्याक्षणी एका हल्लेखोराने प्रज्वलला मानेजवळ पकडले आणि दुसऱ्याने धारदार शस्त्राने गळ्यावर व मानेवर वार केला. हल्ल्यानंतर दोघेही अंधाराचा फायदा घेत रानातून पळून गेले.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT