पुणे

ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंच, सदस्य भिडले

CD

मांडवगण फराटा, ता. १ : शिरूर तालुक्याच्या एका गावातील ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मासिक सभेत झालेल्या बाचाबाचीमुळे दोन गट एकमेकांत भिडले. यावरून महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रतिस्पर्ध्यावर मारहाणीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन महिला पदाधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शेतीच्या अवजारांविषयी चर्चा सुरू होती. दरम्यान, चर्चा सुरू असता त्याचे पर्यावसन भांडणात झाले. यावेळी दोन्ही बाजूने गंभीर आरोप करण्यात आले, तसेच समोरासमोर एकमेकांना जोरदार मारहाण, शिवीगाळ करून धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास मांडवगण फराटा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Statement : २०२४ साली काँग्रेसचे ७५ तर महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडूण आले असते; आयबीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख, नाना पटोलेंचा दावा

MS Dhoni's advice to the Gen Z : युवा पिढीला तू काय सल्ला देशील? महेंद्रसिंग धोनीचा Video पाहायला हवा; म्हणाला, विनंती करतो...

शरद पौर्णिमेची रात्र का मानली जाते विशेष? लक्ष्मीपूजा ते चंद्रदर्शनापर्यंत; वाचा नियम आणि चंद्र दोष निवारणाचे सोपे उपाय!

Gokul Milk Union Election : गोकुळमध्ये निवडूण आलेले महायुतीचे संचालक गावातच राहणार; अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार का?, संचालकांकडून स्पष्टीकरण

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT