पुणे

श्रीगोंदा आगाराची बस मांडवगण फराट्याच्या सेवेत

CD

मांडवगण फराटा, ता. ३ : शिरूर आणि श्रीगोंदा या दोन तालुक्यांना जोडणारी मांडवगण फराटा ते श्रीगोंदा मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचे तांदळी (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. ३१) उत्साहात स्वागत करण्यात आले. ही बससेवा सुरु झाल्याने प्रवासी, विशेषतः विद्यार्थी, नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.
तांदळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा गदादे यांच्या हस्ते श्रीगोंदा आगाराचे व्यवस्थापक संदीप ढवळे, दिगंबर दरेकर यांच्यासह चालक-वाहक यांचा सत्कार करण्यात आला. या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी सरपंच रेखा गदादे यांनी श्रीगोंदा आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर बससेवा सुरू करण्यात आली. ही बस सेवा दररोज असणार असून लिंपणगाव (श्रीगोंदा), काष्टी, तांदळी, माळवाडी, गारमाळ, मांडवगण फराटा या मार्गांवर थांबे असतील. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले. यावेळी काळुराम खोरे, दत्तात्रेय गदादे, श्यामराव कळसकर, पोपट गदादे, दिलीप सोनवणे, सुभाष कळसकर, मधुकर गदादे, सावता गदादे, मारुती गदादे, डॉ. गणेश कळसकर उपस्थित होते.

बस वेळापत्रक:
सकाळची फेरी
▪ ८:०० - श्रीगोंदा येथून मांडवगण फराटाकडे
▪ ८:४५ - आगमन (मांडवगण फराटा)
▪ ८:५० - परतीची बस मांडवगण फराट्याहून
▪ ९:३५ - आगमन (श्रीगोंदा)

दुपारची फेरी
▪ ३:४५ - श्रीगोंदा येथून मांडवगण फराटाकडे
▪ ४:३० - आगमन (मांडवगण फराटा)
▪ ४:३५ - परतीची बस (मांडवगण फराटा)
▪ ५:२० - श्रीगोंदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT