पुणे

शिरसगाव काटा येथे दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

CD

आंधळगाव, ता. १९ : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील साळुंकेवस्ती परिसरात शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. एका घरातून रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर दुसऱ्या घरात घरच्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटा येथील भगवान सदाशिव साळुंके हे पुण्याला कामानिमित्त गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. घरातून वीस हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. दुसऱ्या घटनेत याच वस्तीतील अण्णासाहेब कुंडलिक शेलार यांच्या घरात रात्री पावणे एकच्या सुमारास चोरटे घुसले. घरातील वस्तूंची उचकापाचक करताना आवाज झाल्याने शेलार कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पळ काढला. ग्रामस्थांनीही त्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांची दुचाकी चिखलात अडकली, त्यामुळे दुचाकी तिथेच सोडून चोरट्यांनी अंधारात पळ काढला.

सहा महिन्यात पुन्हा तोच योगायोग
साळुंके वस्तीतील याच दोन्ही घरांमध्ये पाच महिन्यांपूर्वीही चोरट्यांनी एकाच रात्री चोरीचा प्रयत्न केला होता. सुरेश साळुंके यांच्या घरातून तेव्हा चांदीचा गणपती चोरीस गेला होता, तर शेलार कुटुंब जागे झाल्याने त्यांच्याकडे चोरी अयशस्वी झाली होती. या परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मांडवगण फराटा पोलिस चौकीतील कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN Live: भारताची विजयी हॅटट्रिक! Super 4 मध्ये रविवारी IND vs PAK सामन्याची मेजवानी; जाणून घ्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक

IND vs OMN Live: हार्दिक पांड्याची मॅच विनिंग कॅच! अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ओमानच्या कलीमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

SCROLL FOR NEXT