पुणे

मांडवगण येथे तरुणीची आत्महत्या

CD

मांडवगण फराटा, ता. २ : येथे राहत्या घरी १९ वर्षीय तरुणीने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २)दुपारी अडीच वाजता उघडकीस आला. सपना दादा साळवे असे या तरुणीचे नाव आहे. याबाबतची खबर सपनाचे वडील दादा हरिचंद्र साळवे (रा. मांडवगण फराटा) यांनी मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्रात दिली. याप्रकरणी मांडवगण फराटा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा साळवे हे आपल्या पत्नीसह दोन मुले आणि मुलगी सपनासह राहत होते. कामानिमित्त साळवे हे पुणे येथे वास्तव्यास होते, तर मुलगा सुमीत व मुलगी सपना हे आजी-आजोबांकडे मांडवगण फराटा येथे राहत होते. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास साळवे कामावर असताना त्यांना मुलगा सुमीत याचा फोन आला. ‘ताई सपनाने गळफास घेतला आहे,’ अशी माहिती त्याने दिली. तत्काळ तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचे निर्देश वडिलांनी मुलाला दिले. खबर लागताच साळवे दांपत्य तातडीने मांडवगण फराटा येथे पोहोचले. सपना हिला तातडीने येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT