पुणे

इनामगावातील महिलांना आरी वर्क प्रशिक्षण

CD

मांडवगण फराटा, ता. १८ : इनामगाव (ता. शिरूर) येथे शेतकरी कुटुंबातील महिलांना जोडधंदा करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कार्यक्रमांतर्गत आरी वर्क प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये ३५ महिलांनी सहभाग घेतला होता.
इनामगाव ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार (ता. २) ते बुधवार (ता. १७) या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आर्थिक साक्षरतेचेही मार्गदर्शन करण्यात आले. शृंगार प्रतिष्ठानच्या प्रशिक्षक कांचन सोनवणे म्हणाल्या, ‘‘कुटुंब चालवत असताना उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व अचानक उद्भवणारे आजारपण यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणजे आर्थिक साक्षरता. निरर्थक व टाळता येणारे खर्च कमी करणे आवश्यक आहे.आरी वर्क व आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून महिला कुटुंबाचा संसार अधिक सक्षमपणे चालवू शकतात.’’
प्रशिक्षणादरम्यान पैशाचे सुज्ञ व्यवस्थापन, बचत व गुंतवणूक, कर्ज व्यवस्थापन, भविष्यासाठी आर्थिक नियोजन तसेच आवश्यक ज्ञान व कौशल्यांबाबत कांचन सोनवणे व कीर्ती खोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना प्रशिक्षकांनी समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणाच्या समारोपावेळी आरी वर्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निकिता वाळुंज, स्वाती मचाले, संपदा काळे यांचा महिलांचा सरपंच अनुराधा घाडगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच अनुराधा घाडगे, उपसरपंच गणेश लोणकर, विजय मोकाशी, सूरज मचाले, सारिका घाडगे, तात्यासाहेब घाडगे, ग्रामविकास अधिकारी बी. पी. गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT