पुणे

वडगाव रासाईच्या विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

CD

आंधळगाव, ता. २३ : करडे (ता. शिरूर) येथे पार पडलेल्या ५३ व्या शिरूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वडगाव रासाई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. या प्रदर्शनात तालुक्यातील तब्बल १२५ शाळांनी सहभाग नोंदविला होता. इयत्ता ९ ते १२ या गटात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘रोबोटिक स्प्रे’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला असून, या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे.
विज्ञान विषय शिक्षक सुनील गोसावी व प्रयोगशाळा सहाय्यक सुधाकर फुकट यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीतील राजवीर शिवाजी शेलार व सार्थक गणेश जराड या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला. शेतकऱ्यांच्या फवारणीच्या कामात सुलभता, वेळेची बचत व सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने तयार केलेले हे उपकरण नावीन्यपूर्ण असल्याने परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. या उल्लेखनीय यशाबद्दल शनिवारी (ता. २०) ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नंदकुमार मगर, दिनेश वळवी, पांडुरंग मेंडके, विलास पावरा, हेमंत साबळे आदींनी परिश्रम घेतले. चंद्रशेखर काकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य काकासाहेब खळदकर, सरपंच सचिन शेलार, सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार, शिवाजी शेलार, पोपटराव शेलार, रामभाऊ ताम्हाणे, संतोष शेलार, भाऊसाहेब शेलार, गणेश जराड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

Pune Crime : उद्योजकांकडून मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

SCROLL FOR NEXT