पुणे

नागरगाव शाळेतील बाजारात चाळीस हजारांची उलाढाल

CD

आंधळगाव, ता. २९ : नागरगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, पर्यावरण जाणीव व सामाजिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आनंदी बाजार, खाद्य यात्रा घेण्यात आली. यावेळी स्टॉलमधून विद्यार्थ्यांनी चाळीस हजार रुपयांच्या साहित्याची विक्री केल्याची माहिती मुख्याध्यापक भानुदास संकपाळ यांनी दिली.
इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाज्या, फळभाज्या, कडधान्ये, फळे, चहा, मिसळ, वडापाव, इडली, पाणीपुरी, मेदूवडा, खिचडी, गुलाबजाम आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्टॉलवर स्वतःच ग्राहकांशी संवाद साधून आपल्या वस्तूंची विक्री केली व आर्थिक व्यवहार हाताळले.
बाजारात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून ४० हजार रुपयांची उलाढाल झाली. ग्रामस्थांनी खरेदी आणि खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेतला. पालक वर्गाने या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत असे उपक्रम वारंवार राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख दगडू वेताळ यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन सुरेश शिवले यांनी केले. तर आभार भानुदास संकपाळ यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT