मांडवगण फराटा, ता. ३१ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) हद्दीतील घाडगे तळई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. माजी विद्यार्थ्यांनी विविध महापुरुष, क्रांतिकारक व शास्त्रज्ञांचे एकूण ३२ प्रेरणादायी फोटो शाळेला भेट दिले आहेत.
विद्यार्थ्यांना लहान वयातच महापुरुष, क्रांतिकारक व शास्त्रज्ञ यांच्या विचारांची ओळख व्हावी, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि वाचनासोबतच विचारक्षमतेचा विकास व्हावा, या हेतूने माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेस उपयुक्त अशी भेट दिली. येथील शाळेत सन १९७५पासून विविध कालखंडात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह विविध महापुरुष, क्रांतिकारक व शास्त्रज्ञांचे प्रेरणादायी फोटो शाळेला भेट दिले आहेत. हे फोटो वर्गखोल्या व शाळेच्या दालनात लावण्यात येणार असून, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या विचारविश्वावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन काळे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमप्रसंगी वर्गशिक्षिका अर्चना जगताप व शिक्षक अप्पा संकपाळ यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
02612
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.