पुणे

अज्ञात दुचाकीच्या धडकेत आलेगावात शेतकरी जखमी

CD

आंधळगाव, ता. १० : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे अज्ञात भरधाव दुचाकीने पायी चालणाऱ्या शेतकऱ्याला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकऱ्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दादा दिनकर ढोले (रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात शुक्रवारी (ता. ९) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार २८ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ढोले हे आलेगाव पागा ते रांजणगाव सांडस रस्त्याने पायी शेताकडे जात होते. ते रस्त्याच्या कडेला चालत असतानाच अज्ञात दुचाकीचालकाने भरधाव येत त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात ढोले रस्त्यावर कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अपघात घडविणारा दुचाकीचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT