पुणे

माळवाडी शाळेत रंगला बाल आनंदी बाजार

CD

मांडवगण फराटा, ता. १२ : तांदळी (ता. शिरूर) येथील माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोमवारी (ता. १२) बाल आनंदी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बाल आनंदी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळावे, समाजात वावरताना पैशांची किंमत समजावी, तसेच औपचारिक शिक्षणासोबत अनौपचारिक शिक्षणाची जोड मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, खेळणी आदींचे स्टॉल लावून प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेतला. या बाजारातून सुमारे २८ हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक मानसिंग वाकडे यांनी दिली.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, गणेश गदादे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल गाडे, उपाध्यक्ष नवनाथ गदादे, आश्रत गदादे, सुभाषराव कळसकर, ऋषिकेश खोरे, दत्ता गदादे, संभाजी कळसकर आदी उपस्थित होते.
तसेच, याच कार्यक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ यांची जयंतीही साजरी करण्यात आली. यावेळी तांदळी केंद्रातील शिक्षक श्याम काराळे, भागवत शेंडकर, देविदास कुंभार, विकास काळे, मुरलीधर कळसकर, कोमल शिरसाठ, कांचन जाधव, मोहन अनोसे, सचिन शेळके, गोरख कोथिंबिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण रासकर यांनी केले.

02665

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT