पुणे

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिलवान प्रीतमला सुवर्ण

CD

मांडवगण फराटा, ता. १९ : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पहिलवान प्रीतम नवनाथ दाभाडे हिने बँकॉक (थायलंड) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत थायलंडच्या बलाढ्य पहिलवानावर निर्णायक मात करत तिने भारतासाठी सुवर्णयश संपादन केले. या विजयामुळे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे.

बँकॉक येथे इंटरनॅशनल ऑलिंपिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने आयोजित इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारत, थायलंड, मलेशिया व श्रीलंका येथील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाने मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी केली होती. ६८ किलो वजनी गटात पहिलवान प्रीतम दाभाडे हिची निवड झाली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तिने उत्कृष्ट तंत्र, ताकद, डावपेच आणि संयम यांचे प्रभावी दर्शन घडवले. उपांत्य फेरीत तिने प्रतिस्पर्धींवर वर्चस्व गाजवले, तर अंतिम फेरीत थायलंडच्या पहिलवानावर निर्णायक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
आशियाई सुवर्णपदक विजेते व मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडियाचे सरचिटणीस प्रा. पहिलवान अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याचे नवे व्यासपीठ मिळाले असून संघटना, प्रशिक्षक आणि खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रीतमच्या या देदीप्यमान यशामुळे गणेगाव दुमाला परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT