पुणे

मांडवगण फराटा येथे बिबट्याचा महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न

CD

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता.शिरूर)येथील इनामदार वस्ती परिसरात सोमवारी (ता.१९) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अमोल आबासाहेब काशीद यांच्या गोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. याच वेळी हनुमंत काशीद यांच्या पत्नी सोनाली काशीद या पहाटे घराबाहेर आल्या असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घरात धाव घेत दरवाजा बंद केला. त्यामुळे सुदैवाने त्या मोठ्या अनर्थातून बचावल्या. दरम्यान, सुमारे १० दिवसांपूर्वी याच परिसरातील अरविंद फराटे यांच्या वस्तीवर वनविभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून लवकरच परिसरात पिंजरा लावण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT