पुणे

सुजाता पवार यांनी मांडला विकासकामांचा लेखाजोखा

CD

मांडवगण फराटा, ता. २४ : ‘कामाचा हिशोब बोलतो’ या ठाम भूमिकेवर ठाम राहत माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा समोर ठेवून त्या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत माघार घेण्यासाठी २७ जानेवारी ही अंतिम तारीख असतानाही जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुजाता पवार व पंचायत समितीचे उमेदवार विकास शेलार यांनी वेळ न दवडता प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. २४) वडगाव रासाई पंचायत समिती गणातील कुरुळी, आंधळगाव, निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, तसेच निंबोळवस्ती येथे सलग घोंगडी बैठका घेत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. ‘विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार,’ असा ठाम आणि स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.
आपल्या कार्यकाळात कृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांचा थेट लाभ, जनावरांसाठी आरोग्य शिबिरे, पशुखाद्य वाटप व लसीकरण मोहिमा प्रभावीपणे राबवण्यात आल्या. तसेच, ग्रामीण रस्ते, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, नळपाणी योजना आणि अंगणवाडी व शाळांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणल्याचे त्यांनी सांगितले.
‘फक्त आश्वासनांवर राजकारण करणारे नव्हे, तर निधी आणून प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व जनतेला हवे आहे,’ असा अप्रत्यक्ष पण स्पष्ट टोला देत सुजाता पवार यांनी प्रचारात आपली भूमिका अधिक आक्रमक केली. गावोगावी बैठका, पदयात्रा, महिला मेळावे, तसेच हळदीकुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सर्व स्तरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT