पुणे

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित : सुजाता पवार

CD

मांडवगण फराटा, ता. २७ : ‘‘मागील पाच वर्षांत जिल्हा परिषद गटात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली असून, आगामी निवडणुकीत भरघोस मतांनी विजय आपलाच होईल,’’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुजाता पवार यांनी व्यक्त केला.
वडगाव रासाई (ता. शिरूर) परिसरात सुजाता पवार यांनी सोमवारी (ता. २६) व मंगळवारी (ता. २७) घराघरांत जाऊन प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी कष्टकरी महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना मोठा आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसून आला. महिलांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत, ‘काम करणाऱ्या उमेदवारालाच मत,’ अशी ठाम भूमिका व्यक्त केली.
दरम्यान, वडगाव रासाई येथील आठवडे बाजारातही सुजाता पवार यांनी प्रचार करत बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला व नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्हा परिषद गटामध्ये राबविण्यात आलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासकामांची माहिती दिली.
‘‘राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी असल्याने जिल्हा परिषद गटातील उर्वरित विकासकामे अधिक वेगाने पूर्ण केली जातील. ‘मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम केल्यासच विजय निश्चित होईल. पक्ष संघटन मजबूत ठेवून विकासाचा ध्यास कायम ठेवूया,’’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी वडगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार विकास शेलार म्हणाले, ‘‘उच्चशिक्षित असल्याने पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. पंचायत समितीच्या विविध योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न केले जातील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर, कार्यकर्त्यांचा भावनिक आक्रोश

Ajit Pawar Baramati Police : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची पुणे ग्रामीण पोलिसात तक्रार, अपघाताचं नेमकं कारण येणार समोर...

Latest Marathi News Live Update : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

SCROLL FOR NEXT