मांडवगण फराटा, ता. २७ : इनामगाव (ता. शिरूर) परिसरात एकाच दिवशी दोन मादी बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांच्या सततच्या दर्शनांमुळे व हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी या कारवाईनंतर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
वाळुंजपट परिसरात मोहन शिंदे यांच्या शेतात वनविभागाने पूर्वीच लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (ता. २७) सकाळी सुमारे सात वाजता सुमारे दोन ते अडीच वर्षे वयाची एक मादी बिबट जेरबंद झाली. बिबट जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास इनामगाव हद्दीतील म्हसोबावाडी परिसरात सतीश नाईकरे यांच्या उसाच्या शेतात दुसऱ्या तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र, बिबट्या उसाच्या शेतात लपून बसल्याने त्याला पकडणे मोठे आव्हान ठरत होते. अखेर सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळीच्या साहाय्याने बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले.
02713
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.