पुणे

मांडवगण फराटा येथे शोकसभा

CD

मांडवगण फराटा, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. दादांच्या आठवणींना उजाळा देत शोकसभा घेतली. ग्रामस्थ व व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने बंद ठेवली. येथील वाघेश्वर मंदिरात सर्व पक्षाच्यावतीने शोकसभा घेऊन पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. प्रचाराच्या गाड्यांचा धुरळा उडत असतानाच ही बातमी समजल्यावर सर्वच निःशब्द झाले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला असताना दादांच्या निधनाची बातमी समजताच वडगाव- मांडवगण फराटा, तसेच रांजणगाव सांडस गणात सर्वच पक्षांनी आपला प्रचार बंद ठेवून पवार यांना आदरांजली वाहिली.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, बाबासाहेब फराटे, आत्माराम फराटे, शंकर फराटे, लक्ष्मण फराटे, सरपंच समीक्षा फराटे, किशोर फराटे, लतिका वराळे, सागर फराटे, राजेंद्र दरेकर, शरद गायकवाड, महेश जाधव, खंडेराव फराटे, सीमा फराटे, सुभाष फराटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

Latest Marathi News Live Update : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळ

Mahayuti Leaders Meeting Mumbai : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळवर मुंबईत खलबते; महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलं! सतेज पाटील एकाकी पडणार

Donkey Breeding Scheme: आता गाढव ठरणार ‘सोन्याची खाण’! केंद्र सरकार देणार तब्बल ५० लाखांची मदत; काय आहे योजना?

Stock Market Today: 4 सत्रांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT