पुणे

इनामगावात विद्यार्थ्यांना व्‍यावहारिक धडे

CD

मांडवगण फराटा, ता. २२ : इनामगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (ता. २१) खाऊ गल्ली आणि आनंदी बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञानासाठी आणि आर्थिक साक्षरतेसाठी हा उपक्रम आयोजित केला होता.
या बाल आनंदी बाजारात ओली भेळ, इडली, डोसा, पाणीपुरी, कांदा भजी, ढोकळा, वडापाव, अप्पे, बासुंदी, लिंबू सरबत, तसेच भाजीपाला, किराणा माल, स्टेशनरी आदी पदार्थांची दुकाने थाटली होती. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, महिला पालक उपस्थित राहात विविध पदार्थांची खरेदी करत पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रत्येक स्टॉलवरील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आकर्षक सजावट विशेष लक्षवेधी ठरली. व्यवहाराचे ज्ञान, संघभावना निर्माण व्हावी, म्हणून बाल बाजाराचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब जाधव यांनी दिली.
या आनंदी बाजारात सुमारे ७० हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. रोख व्यवहाराबरोबरच क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारही करण्यात आले. शिक्षिका सुनीता लगड, चंद्रकांत खैरे आणि स्मिता बुधे-वाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन सरपंच अनुराधा घाडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी घोडगंगाचे संचालक सचिन मचाले, घोडगंगाचे माजी संचालक दिलीप मोकाशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, पल्लवी घाटगे, संजय घाडगे, रवींद्र घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर मचाले, वैजयंता घाडगे, कविता नलगे आदींसह शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02866

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT