आंधळगाव, ता.२३ : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे भरधाव मोटारीने दुचाकीला ठोकरल्याने १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १८ जानेवारीला रात्री आठच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी विजय रामदास सात्रस (वय ४८,रा. उरळगाव, ता. शिरूर) यांनी रविवारी (ता.२२) दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात राहुल भीमाजी कोळपे (रा.उरळगाव, ता.शिरूर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव रामदास सात्रस (वय १८) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी विजय सात्रस यांचा मुलगा प्रणव हा १८ जानेवारीला दुचाकीवरून(एम.एच १२ व्हीयू ३९१७) बाहेर निघाला होता. रात्री ८.११ वाजता शांताराम गिरमकर यांनी विजय सात्रस यांना फोन करून बाळासाहेब जांभळकर यांच्या पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याची माहिती दिली. विजय सात्रस तातडीने घटनास्थळी पोहोचले असता प्रणव हा रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. घटनास्थळी राहुल कोळपेची मोटार (एमएच १२ यूसी ३१८१) उभी होती. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रणव याला प्रथम ग्रामीण रुग्णालय न्हावरे येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खांदवे नगर, वाघोली येथील जीवन रक्षक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. चार दिवसांनी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आतापर्यंत त्याच्यावर आठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुद्धीवर आल्यानंतर प्रणवने दिलेल्या माहितीनुसार,न्हावरे बाजूकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीने त्याच्या दुचाकीच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिल्याचे सांगितल्यानंतर रविवारी फिर्याद देण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.