पुणे

तांदळी ग्रामस्थांचा ४ मार्चला ‘रास्ता रोको’चा इशारा

CD

मांडवगण फराटा, ता.२५ : शिरूर तालुक्यातील तांदळी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८-डीवरील सुरक्षाविषयक कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ४ मार्च रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तांदळी येथील कळसकरवाडी,बनकर वस्ती तसेच मुख्य गावातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. मात्र, रस्त्यालगत आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी,अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महामार्ग ओलांडताना शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. यापूर्वी झालेल्या अपघातांत काहींना जीव गमवावा लागला असून काहीजण कायमचे अपंग झाले आहेत. तरीही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित अपघातांची नोंद मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्र येथे झाल्याचे निवेदनात नमूद आहे. बुधवारी (ता.१८) झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक २/१ नुसार ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार बुधवारी ४ मार्च २०२६ला सकाळी १० वाजता तांदळी येथील कै.र.वा.कळसकर विकास सोसायटीसमोर राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे अर्जदार प्रा.सुभाष दिनकरराव कळसकर व ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान,जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता,अहिल्यानगरचे उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार शिरूर आणि पोलिस निरीक्षक शिरूर यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी,अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
रबरी स्पीड ब्रेकर बसविणे,बंद असलेल्या पथदिवे सुरू करणे, धोकादायक वळणांवर गार्डरेल बसविणे, मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा उभारणे,दोन्ही बाजूंना फुटपाथलगत लोखंडी रेलिंग बसविणे तसेच झुडपे काढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

SCROLL FOR NEXT