आंधळगाव, ता. ९ : अरणगाव (ता. शिरूर) येथे शनिवारी (ता. ७) ऊस पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर तसेच रेशीम उद्योगातील संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग पंचायत समिती शिरूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
सहायक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी ‘महाविस्तार’ ॲपबाबत माहिती देत शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डॉ. संदीप घोले यांनी ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रोक्त पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. माती परीक्षण, जमिनीचे आरोग्य सुधारणा, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व, सेंद्रिय खत निर्मिती, उपयुक्त जिवाणूंचा वापर, उभी-आडवी नांगरट, बुरशी व हुमणी किडीचे नियंत्रण, दर्जेदार बियाणे निवड तसेच सरी काढण्याची योग्य पद्धत, सरीची रुंदी-खोली व दिशा याबाबत त्यांनी माहिती दिली.
मेळाव्यानंतर शेतकरी धोंडिबा इंगळे यांच्या ऊस प्रक्षेत्राला भेट देऊन खोडकिडीच्या प्रादुर्भावाबाबत डॉ.घोले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना सूचविल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विस्तार अधिकारी सोनटक्के यांनी केले. सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी सूत्रसंचालन तर आलेगाव पागा येथील तंटामुक्ती अध्यक्ष आबा ठोंबरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.