पुणे

शिरूरमधील दुहेरी हत्यांचा धक्कादायक उलगडा

CD

आंधळगाव, ता. २० : शिरूर तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलांच्या निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून, एकाच आरोपीने दोन्ही खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. समलैंगिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून हत्या केल्याचे आरोपी अक्षय दत्तात्रेय मांजरे (वय २२, रा. दहिवडी, ता. शिरूर) याने कबूल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिली.
या प्रकरणातील १० वर्षे वयाच्या मुलाची २१ जून २०२४ रोजी आणि १२ वर्षे वयाच्या मुलाची १७ मार्च २०२६ रोजी एकाच पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अक्षय मांजरे याला अटक करण्यात आली असून, त्याने दोन्ही खून डोक्यात दगड घालून केल्याची कबुली दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन शेतातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड करत आहेत. या प्रकरणातील हत्या झालेली मुले अल्पवयीन आहेत. त्यामुळे ‘सकाळ’मध्ये त्यांची नावे वापरलेली नाहीत.

पोलिसांना धारेवर धरल्यावर तपास
दोन्ही प्रकरणांत मृतदेह एकाच शेतात सापडूनही सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी गांभीर्य दाखवले नाही. उलट बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता पुढे करत तपास वनविभागाकडे ढकलण्यात आला. वनविभागाने वन्यप्राण्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुसऱ्या मुलाचा मृतदेह मिळाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच, पहिल्या मुलाच्या प्रकरणात पोलिसांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर केला. ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास वेगाने पुढे नेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिस तपासात आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे.

तपासातील गंभीर त्रुटी उघड
पहिल्या मुलाच्या खून प्रकरणात कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतरही आरोपी अक्षय मांजरे याला चौकशीनंतर सोडण्यात आले होते. त्या वेळी सखोल तपास का झाला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी कोणती चौकशी केली, याबाबत स्पष्टता नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. पहिल्या प्रकरणात सुरुवातीपासून सखोल तपास झाला असता तर आरोपी त्याच वेळी अटकेत आला असता. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी तब्बल २१ महिने मोकाट फिरत राहिला. धक्कादायक बाब म्हणजे, तो पहिल्या मृताच्या अंत्यविधीतही सहभागी झाला होता. या निष्काळजीपणामुळेच दुसऱ्या मुलाचाही बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

‘फाईल बंद’च्या घाईचा फटका
प्रकरण लवकर निकाली काढण्याच्या घाईत पहिल्या प्रकरणात ‘बिबट्याचा हल्ला’ असा निष्कर्ष काढण्यात आला का? असा सवाल उपस्थित होत आहे. घटनास्थळी आढळलेले पुरावे, जखमांचे स्वरूप आणि स्थानिकांच्या शंका याकडे दुर्लक्ष झाले का? याची चौकशी होण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणात तपासाची दिशा चुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, संबंधित तपासी अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. तपासातील त्रुटींसाठी नेमके कोण जबाबदार, याची निश्चिती करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT