पुणे

उरळगाव येथे शेतकऱ्याचे २५ हजार रुपये लंपास

CD

आंधळगाव, ता. २४ : कांदा विक्रीतून मिळालेले २५ हजार रुपये पॅन्टच्या खिशात ठेवून डाळिंबाच्या पिकावर औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना उरळगाव (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. २२) सायंकाळी घडली.
याप्रकरणी उमेश रामचंद्र शिंदे (वय ३८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी न्हावरे पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. शिंदे यांनी उरळगाव येथील नामदेव गिरमकर यांच्या शेतात वाट्याने डाळिंबाची लागवड केली आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते पुण्यातील चंदननगर येथून कांदा विक्री करून शेतात आले होते. कांदा विक्रीचे २५ हजार रुपये त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवले होते.
शेतात आल्यानंतर पिकावर औषध फवारणी करण्यासाठी शिंदे यांनी अंगावरील कपडे शेताच्या कडेला काढून ठेवले आणि दुसरे कपडे घालून फवारणीसाठी गेले. सायंकाळी सातच्या सुमारास फवारणी पूर्ण करून ते परत आले असता, पॅन्टच्या खिशातील २५ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Crime : माजी महिला सरपंचासह सासऱ्यांना घरात घुसून मारलं; इचलकरंजीलगत असलेल्या गावात धक्कादायक घटना, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

रितेश आणि जिनिलिया देशमुख सहकुटुंब अजमेर शरीफ दर्ग्यावर; चादर, फुलंही चढवली; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी चकीत

India Farmer IDs: देशात ११ हजार किसान पहचान पत्रांचे वाटप; मुदतीच्या पाच महिने आधी उद्दिष्ट पूर्ण

Latest Marathi News Live Update : मुंबई ATS कडून माहिममधून ३३ वर्षीय तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT