पुणे

आळंदीत बचत गटास स्वयंरोजगारासाठी मदत

CD

आळंदी, ता. १५ : नगरपरिषदेमार्फत शहरातील महिला बचत गटांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून यावेळी इंदिरा स्वयंसहाय्यता बचत गटास व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी सात लाख रकमेचे कर्ज वाटप मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते धनादेश देवून करण्यात आले.
महिला दिनानिमित्त आळंदी नगरपरिषदेमार्फत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी यावेळी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची गरज, स्त्रीभ्रूण हत्येच्या समस्यारुपी राक्षसास कारणीभूत मानसिकता बदलाची गरज आदी विषयांवर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या शीतल जाधव, अर्चना पाटील, देवश्री कुदळे, साधना शिंदे यांच्यासह महिला कर्मचारी आणि नगरपरिषदेच्या शाळांच्या शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनाच्या कार्यक्रमात चिमुकल्या शाळकरी मुलींनी अभिनयाद्वारे नारी शक्तीचा जागर केला. तसेच स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरण यासारख्या संवेदनशील विषयांवर भारुड, नाटक, एकांकिका, भाषण, समूहगीत, पथनाट्याद्वारे प्रबोधनात्मक संदेश देत नारी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
3226

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT