पुणे

आळंदीत चोरट्याचा कागदपत्रे, पैशांवर डल्ला

CD

आळंदी, ता.१ : कीर्तनासाठी बाहेरगावी गेलेल्या महाराजांच्या आळंदी (ता. खेड) येथील घरी चोराने कडी कोयंडा तोडून कागदपत्रे आणि पैशांवर डल्ला मारला. आळंदीतील वारकरी विद्यार्थ्यांना सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची महत्त्वाची कागदपत्रे आणि साडे सत्तेचाळीस हजार रुपयांची रोख रोकड चोरी झाल्याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चोरीची घटना मंगळवारी (ता.२५) रात्री ते बुधवारी (ता.२६) पहाटेच्या दरम्यान संतोष महाराज सुंबे (रा. घुंडरे गल्ली, आळंदी देवाची)
यांच्या घरी घडली. याबाबत फिर्याद त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात दिली. सुंबे हे कीर्तनकार असून सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे दैनंदिन शासकीय निमशासकीय, मंत्रालयातील कामकाज तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कामकाजाबाबत संस्थेस मदत करत आहे. यामुळे संस्थेचे न्यायालयीन कामकाजाची महत्त्वपूर्ण मूळ कागदपत्रे ते स्वतःच्या मालकीच्या घरी ठेवत असत. सुंबे हे बुधवारी (ता.२६) खामगावहून प्रवासात परत आळंदीला येत असताना त्यांच्या घरातील अन्य इसमाने चोरी झाल्याबाबत कल्पना दिली. यामध्ये अज्ञात सुंबे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा चोरट्याने तोडला. घरातील कपाटातील कागदपत्रे तसेच अन्य विद्यार्थ्यांच्या पत्र्याच्या पेट्याही चोरून नेल्या. सोबत साडे सत्तेचाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. याबाबत अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT