पुणे

वारीसाठी माजी विश्वस्तांचे सहकार्य घेण्यात येणार

CD

आळंदी, ता. २३ : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर भाविकांना सोई सुविधा देताना प्रशासनाबरोबर ठेवावा लागणारा समन्वय व प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होऊन करावी लागणारी वाटचाल याचा विचार करता माजी विश्वस्तांचे सहकार्य घेण्याचा ठराव श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने मासिक सभेत केला. यामुळे माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक, सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरु यांचे वारी काळात सहकार्य घेण्यात येणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे यांनी सांगितले.
आषाढी पायी वारी सोहळा शिस्तीत, शांततेत, आनंदात व वारकऱ्यांची सुरक्षितता व आरोग्य विचारात घेऊन पार पाडणे गरजेचे आहे. या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये प्रथमच तीन विश्वस्त नियुक्त असून उर्वरित तीन विश्वस्तांच्या जागा अद्याप भरल्या गेल्या नाही. त्यामुळे साधारण चार ते पाच लाख लोकांचे वेगवेगळ्या स्तरावरील नियोजन प्रशासनाबरोबर ठेवावा लागणारा समन्वय व प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होऊन करावी लागणारी वाटचाल याचा विचार करता सध्याच्या नियुक्त विश्वस्तांना प्रचंड ताण येणार आहे. माजी विश्वस्तांनी सोहळ्यासाठी अत्यंत चांगले योगदान दिले आहे. वारकऱ्यांशी व प्रशासनाशी सुसंवाद यापूर्वीच्या विश्वस्त टिळक, पिंपळे, सुरु यांनी ठेवला. त्यांचे सहकार्य घेण्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सुचविले असता त्यास दुसरे विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी अनुमती दिली. याबाबत ठराव उपस्थित विश्वस्तांनी एकमताने मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT