पुणे

देऊळवाड्यातून प्रस्थानाचे थेट प्रक्षेपण

CD

लोगो- आषाढी वारी


आळंदी, ता. ६ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे देऊळवाड्यातील थेट प्रक्षेपण रविवारी (ता. ११) केले जाणार असून, शहरातील विविध सहा ठिकाणांसह दर्शबारीत मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच, देऊळवाड्यातील भाविकांची सुरक्षा आणि संशयित घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ९५ सीसीटीव्ही कॅमेरे देऊळवाडा आणि परिसरात लावले आहेत.
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आळंदीत पालखी प्रस्थान येत्या रविवारी आहे. मंदिरातील गर्दीचे नियोजन, घातपात अथवा चोरीसारख्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी देवस्थान व्यवस्थापनाने ९५ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावले आहेत. मंदिराभोवतीही कॅमेरे लावले जाणार आहेत. प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिराबाहेरील भाविकांना केले जाणार आहे. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी ही सोय केली जात आहे. यासाठी प्रदक्षिणा रस्ता, भराव रस्ता, वडगाव चौक, मरकळ चौक, पालिका चौक, इंद्रायणी घाट आणि दर्शन मंडप, अशा सहा ठिकाणी स्क्रीन लावले जाणार आहेत. मंदिर स्वच्छतेसाठी देवस्थानचे ३५ कर्मचारी आणि स्वकाम सेवा मंडळाचे दोनशे स्वयंसेवक एका वेळी २५च्या गटाने २४ तास स्वच्छता करणार आहेत. महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि त्यांच्या बरोबर तीन माजी विश्वस्त संपूर्ण वारी काळासाठी असणार आहेत.
सोहळ्यासाठी दिंडीकऱ्यांना निमंत्रणे यापूर्वीच दिली आहेत. एकंदर सोहळ्यासाठी देवस्थान सज्ज झाले आहे.

सुई-दोऱ्यापासून तयारी
माउलींच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर प्रवासात जेवण, नैवद्याच्या किराणा माल सामानासह सुई-दोराही सोबत ठेवला आहे. त्यासाठी पालखी सोहळ्यात लागणाऱ्या विविध साहित्यानी संस्थानचे भांडारगृह सज्ज झाले आहे. वारीत ट्रकमध्ये देवस्थानने कपाटे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू प्रवासात देखील हवी ती वस्तू, हवी त्यावेळी काढता येणार आहे. एकंदरीत फिरते भांडारगृहच यंदाच्या वारीत असणार आहे. तब्बल एक महिन्याच्या प्रवासात लागणाऱ्या तंबू, राहुट्यांची कापडे, लोखंडी खुट्या, स्वयंपाक भांडी, पालखीसोबतच्या अब्दागिरी, शाली, पडदे, झुंबर, किराणा माल, पत्रावळी, पूजा-विधीची भांडी, पालखीवरील छत्र्या, समया, दानपेट्या, प्रभावळ, गरुडटक्के, चौरंग, बैलजोडी जुंपणे, गाद्या, बेडशीट, उशी, तांब्या-पितळी भांडी, माउलींचे पोशाख, विद्युत दिवे, बॅटऱ्या, पखवाज, स्टेशनरी साहित्य, पाट, श्रीफळ, शाली, पूजा साहित्य, गॅस शेगडी सिलिंडर अशी इत्थंभूत साहित्यांची जमवाजमव केली आहे. वारीसाठी देवस्थानला फ्रिज आणि इतर सामान ठेवण्यासाठी चार कपाटेही दानात मिळाली आहेत. जवळपास संपूर्ण घरसंसार सोहळ्यासोबत आहे.

तयारी दृष्टीक्षेपात
- प्रस्थान सोहळ्याचे थेट देऊळवाड्यातून प्रक्षेपण करणार
- आळंदी शहरात सहा ठिकाणी स्क्रीन
- देऊळवाडा आणि परिसरात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे
- कर्मचारी, स्वयंसेवक २४ तास स्वच्छता करणार
- महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT