पुणे

स्थानिक विश्‍वस्त नियुक्तीच्या मागणीसाठी उद्या बंद

CD

आळंदी, ता. ३ : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त समितीची निवड करताना ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ आळंदीत मंगळवारी (ता. ५) दळणवळण आणि व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाने निषेध मोर्चा काढून महाद्वार सभेचे आयोजन केले आहे. या बाबतचे निवेदन ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील यांना दिले.

‘‘देवस्थानवर विश्वस्त पदासाठी आळंदीकरांनी अर्ज केले होते. मात्र मुलाखती झाल्यानंतर एकाही आळंदीकरांची निवड केली नाही. त्यामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.’’ असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे यांच्याकडेही दोन आठवड्यांपूर्वी नेमलेल्या तीन विश्‍वस्तांच्या नेमणुकीवर हरकत घेतल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे...
आत्तापर्यंत आळंदीबाहेरील विश्वस्त असल्याने भाविकांच्या व्यवस्थापनाबाबत कोणतेच प्रश्न सोडविले नाहीत. स्थानिक प्रशासन आणि आळंदी देवस्थान यांच्याच सुसंवाद नसल्याने नेहमीच गैरसोय आणि अनुचित प्रकार घडतात. अनेकदा नेमलेल्या विश्वस्तांची गैरहजेरी असते. दर्शनमंडप जागेचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून सोडवता आला नाही. संस्थानच्या नावे गायरान जागेत विकासकामे केली नाहीत. अन्य देवस्थाने वेगाने विकास करत आहेत. मात्र सातशे वर्षांपासूनचे देवस्थान विकास आणि सोयी-सुविधांबाबत मागास असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक आळंदीकरांची नेमणूक होणे अपेक्षित आहे. देवस्थानच्या कारभाराबाबत तक्रारी करूनही उत्तरे दिली जात नाहीत. जिल्हा न्यायालयांना वेळ मागूनही भेटीसाठी वेळ दिला नाही. नव्याने नेमणूक केलेल्या तीन विश्वस्तांबाबतचा २० नोव्हेंबरचा आदेश रद्द करावा अशी मागणी आहे. त्यामुळे निषेध सभा आणि बंद करण्यात येणार आहे.

विश्वस्त निवड हा जिल्हा न्यायालयाचा निर्णय आहे. आलेले अर्ज आणि नावे आम्ही न्यायालयाकडे पाठवली होती. त्यामध्ये आळंदीकरांचीही नावे होती. ही निवड प्रक्रिया उघडपणे आणि पारदर्शकता होती. अनेक वर्षांचा इतिहास पाहता आळंदीकरांचे यापूर्वी अर्जच नव्हते. माऊलींची सेवा सर्वांकडून व्हावी हीच आमची भावना आहे. सहाही विश्वस्त आळंदीतून झाले तर हरकत नाही. तसे योगदानही असले पाहिजे. आळंदीकर म्हणून देवस्थानला मदत काय आहे. आजपर्यंत विकासकाम काहीच झाले नाही म्हणणे चुकीचे आहे. गायरान विकसनासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला आहे. शासनाकडून गायरानाची जागा आम्ही सोडवली. अन्नछत्र,मंदिर व्यवस्थापन आदी कामे आमच्या काळात झाली आहेत.
योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT