Ashadhi Wari Schedule esakal
पुणे

Ashadhi Wari Schedule: पाऊले चालती पंढरीची वाट! माउलींच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकमध्ये

Ashadhi Wari Timetable: आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची बैठक सोमवारी (ता. १८) पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

CD

आळंदी, ता. १८ : पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (२९ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा १६ जुलैला पंढरीत पोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १७ जुलैला आहे.

दरम्यान, सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगणे होणार आहेत. पालखी मार्गावर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये अडीच दिवस, फलटणमध्ये एक दिवस, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि सासवड येथे प्रत्येकी दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. ३२ दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा ३० जुलैला आळंदीत परतणार आहे.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची बैठक सोमवारी (ता. १८) पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, विठ्ठल महाराज वासकर, राणा महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, माउली महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज गोसावी, मारुती महाराज कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर आणि दिंडीकरी फडकरी यांची उपस्थिती होती.

याबाबत अधिकची माहिती देताना पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजनाथ म्हणाले,
संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीतून २९ जूनला देऊळवाड्यातून सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. पहिला मुक्काम आळंदीतच नविन दर्शन मंडपात राहील. ३० जूनला सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात ३० जून व १ जुलै, अशा दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (२ व ३ जुलै), जेजुरीत (४ जुलै) व वाल्ह्याला (५ जुलै) असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंदला (६ जुलै) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहचेल.


८ जुलैला लोणंद तळावरील दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगावला ८ जुलै रोजी मुक्कामी जाईल. फलटण (९ जुलै), बरड (१० जुलै), नातेपुते (११ जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरसला (१२ जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माउंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर(ता. १३) मुक्कामी जाईल.

ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे संत सोपानदेव माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडिशेगावला (१४ जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीत १५ जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील.

वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकाजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला १६ जुलै रोजी प्रवेश करेल. आषाढी एकादशीला (१७ जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान असा कार्यक्रम आहे. त्यानंतर २१ जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल- रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला झाल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे. ३० जुलैला सोहळा आषाढी वारी करून आळंदीत पोहचेल.

पालखी तळांसाठी जागेची मागणी

पालखी सोहळ्यादरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी आणि विसाव्याच्या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आणि अतिरिक्त जमिनीची मागणी करून पाठपुरावा करावा, अशी बैठकीत चर्चा झाली.

सोहळ्यातील रिंगणे

१) पहिले उभे रिंगण- चांदोबाचा लिंब.
२) पहिले गोल रिंगण- पुरंदवडे.
३) दुसरे गोल रिंगण- खुडूस फाटा.
४) तिसरे गोल रिंगण- ठाकुरबुवाची समाधी.
५) दुसरे उभे रिंगण- बाजीरावची विहीर वाखरी.
६) चौथे गोल रिंगण- बाजिरावची विहीर वाखरी.
७) तिसरे उभे रिंगण- इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT