पुणे

आळंदीच्या ज्ञानेश्‍वर विद्यालयाचा निकाल ९९. ४६ टक्के

CD

आळंदी, ता. ३१ : येथील ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या ३७१ विद्यार्थ्यांपैकी ३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल ९९. ४६ टक्के निकाल लागला. यातील ९६ विद्यार्थी डिस्टींक्शनमधे, १५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमधे, ११६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमधे, तर दोन विद्यार्थी पास श्रेणीमधे उत्तीर्ण झाले. दिव्यांगामधे शंभर टक्के निकाल लागला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

वाढपी अन् कपड्याच्या दुकानात सेल्समनचे काम करणाऱ्यांच्या मुलांचे यश उल्लेखनीय...
ज्ञानेश्वर विद्यालय म्हणजे बहुतांश विद्यार्थी हे वारकरी शिक्षणासोबतच शालेय शिक्षण घेणारे आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेले विद्यार्थी येथे शिकत आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडा, खानदेश, विदर्भातून रोजंदारीसाठी आलेली बहुतांश वर्गातील मुलं इथे शिकत असतात. मग यामधे कुणाचे आई-वडील मंगल कार्यालयात वाढपी, आचारी म्हणून काम करतात. तर कुणाचे आईवडील दुकानांमध्ये काम करतात. यांच्या मुलांनी जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT