पुणे

आईवडिलांशी वादातून मोटारसायकली जाळल्या

CD

आळंदी, ता. १ : आईवडिलांशी झालेल्या किरकोळ वादातून मुलाने घरासमोरील दोन मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळल्या, तर आईवडिलांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश पंढरीनाथ कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल केल्या युवकाचे नाव असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (ता. ३१) आळंदी- चऱ्होली रस्त्यावर घडली. या प्रकरणी फिर्याद आरोपी मुलाच्या आईने आळंदी पोलिस ठाण्यात दिली. आरोपीने घरामध्ये मोठ्याने आरडाओरडा करत घरातील वस्तूंची तोडफोड लाकडी बॅटने केली. सोबत घरासमोरील दोन मोटारसायकलही जाळल्या. आईवडिलांना हाताने मारहाण करत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT