पुणे

भावना दुखावतील अशा पोस्ट न करण्याचे आवाहन

CD

आळंदी, ता. ३ : ‘‘लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नयेत. घोषणाबाजी करू नये. अन्यथा पोस्ट करणाऱ्या सदस्यांसह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’’ असे आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. बी. नरके यांनी सांगितले.

आळंदी पोलिस ठाण्याच्या वतीने आळंदी हद्दीतील सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन केले. यामधे नरके यांनी सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लीकेशनच्या माध्यमांद्वारे कोणत्याही समाजांच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेन्ट्स, स्टोरी, स्टेट्स, डिजिटल बॅनर असे प्रकार माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात असून पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकालानंतर डीजे वाजवू नये. फटाके फोडू नयेत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणतेही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणत्याही सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यांसह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT