पुणे

आळंदीतील शिवसृष्टी बनली आकर्षण केंद्र

CD

आळंदी, ता. १० : दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा...भोवताली हिरवेगार गालीच्यांची हिरवळ...तोफांलगतच उभे असलेले मावळे आणि आकर्षक पथदिव्यांची मांडणी केली आहे. त्यामुळे आळंदीतील पालिका चौकातील शिवसृष्टी नागरिकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. आळंदीकरांनी नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक केले.
शिवसृष्टीसाठी पालिका चौकातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढले. चौक सुशोभिकरणअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच जिल्हा नियोजन समितीमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत (जिल्हास्तर) दहा लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केले आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात केली. पालिका चौकात पालिकेने बांधलेले शॉपिंग सेंटरसमोर टपऱ्या हातगाड्यांचे अतिक्रमण अनेक वर्षांपासून होते. याचबरोबर याठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त लागलेल्या होत्या. आता पालिकेने हातगाडीधारकांना विश्वासात घेत सर्व हातगाड्यांचे अतिक्रमण काढले.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, आळंदी

रंगीत लाईटींची व्यवस्था
अडीच महिन्यांत काम पूर्ण झाल्यानंतर परिसराच्या व पर्यायाने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. याचबरोबर प्रतिकात्मक मावळेही या शिवसृष्टीभोवती उभे केले आहे. आकर्षकरीत्या तोफांची मांडणी केलेली आहे. रंगीत लाईटींगची व्यवस्था रात्रीच्यावेळी केली आहे. पुतळ्याच्या भोवती आकर्षक विद्युतदिव्यांची मांडणी केल्याने रात्रीच्यावेळी चौक उजळून निघाला आहे.

अन्य ठिकाणांचे सुशोभीकरण
पालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जसे चौक सुशोभीकरण काम सुरू केले. तसेच चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ चौक, देहूफाटा चौक याठिकाणीही सुशोभीकरण प्रस्तावित आहे. पालिकेत प्रशासनाचे कामकाज सुरू झाल्यापासून चौक सुशोभिकरणास गती मिळाली आहे. आता चाकण चौकातही सुशोभीकरण सुरू असून याठिकाणी वारकरी संप्रदायावर आधारित काम केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Nashik Election : "सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी" : नाशिक काँग्रेसचा 'वोट चोर, गद्दी छोड' अभियानातून भाजपवर हल्लाबोल

Kolhapur Crime News : धक्कादायक! रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड; पालकांनाही धमकी, कोल्हापूरात खळबळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

SCROLL FOR NEXT