पुणे

शिखर समितीच्या बैठकीत आळंदीकडे दुर्लक्ष

CD

आळंदी, ता. २८ : आषाढी कार्तिकीसाठी दर्शन मंडप नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंग रोड नाही. इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्रकल्प नाही, असे विविध प्रश्‍न आळंदीत आहेत. मुंबई सह्याद्री अतिथिगृह येथे मंगळवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी दिली. यात राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची कामे होणार आहेत. मात्र आळंदीच्या दर्शनमंडपासाठी निधीची तरतूद न करता मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे.
आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन मोठ्या वाऱ्या‍ लाखोंच्या संख्येने भरतात. महिन्याची एकादशी, लग्नाच्या निमित्ताने आळंदीत भाविकांची सतत वर्दळ असते. त्यासाठी दर्शनमंडपाची नितांत आवश्यकता आहे. मात्र आठ वर्षांच्या कालावधीत भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आळंदीतील तत्कालीन नगराध्यक्ष भाजपचे असल्याने त्यांची जागा आणि एका शिक्षणसम्राटाच्या ७८ गुंठे जागेवरचे दर्शनमंडपाचे आरक्षण असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस घेत आरक्षण उठवले. आणि दर्शनमंडप जागेचा प्रश्‍न उभा राहिला. याचबरोबर मोठ्या संख्येने ये‍णाऱ्या भाविकांनी वाहने कुठे उभी करावीत हा प्रश्‍न त्यांना पडतो. वाहनतळाचे आरक्षणही याच सरकारने उठवले. आता वाहनतळ आणि दर्शनमंडपचा प्रश्‍न जागे अभावी रखडला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून दर्शनमंडप करण्यासाठी आग्रही आहे. गेली तीन वर्षे दर्शन मंडप आरक्षण प्रस्ताव प्रलंबित आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा भाग दोनमधून काम करण्याचे नियोजन शासनस्तरावर आहे. याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पातळीवर चर्चा सुरु आहेत. याचबरोबर शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी देहूफाटा मरकळ रस्ता इंद्रायणी बाजूने करण्याचा प्रस्ताव आहे.
कैलास केंद्रे, मुख्याधिकारी

शहरातील प्रमुख प्रश्‍न
- आषाढी कार्तिकी वारीसाठी दर्शनमंडप
- रिंग रोड पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडी
- एसटीपीचे आरक्षण उठवल्याने अद्याप गटाराचे सांडपाणी इंद्रायणीत
- वाहनतळाचे आरक्षण उठवल्याने भाविकांना वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न
- आळंदीकरांना दोन दिवसांनी पिण्याचे पाणी
- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शंभर कोटींहून अधिक अखर्चिक निधी अद्याप जिल्हा प्रशासनाकडे पडून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT