पुणे

आळंदीमध्ये इंद्रायणीत कपडे धुण्यासाठी गर्दी

CD

आळंदी, ता. २ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता अभियान सुरु आहे. आळंदीत मात्र इंद्रायणी नदीत गोधड्या, कपडे धुवून अस्वच्छता, प्रदूषणात भर घातली जात असल्याचे चित्र आहे. इंद्रायणी नदीकाठी दगडी घाट आणि नदीपात्राचा वापर कपडे धुण्यासाठी केला जात आहे.
घटस्थापनेमुळे घरोघरी स्वच्छता सुरु आहे. अनेकजण घरातील कपड्यांची धुलाई करत आहेत. आळंदीत इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर कपडे वाळत घालण्यासाठी विस्तीर्ण दगडी घाट आहे. तसेच नदीपात्रात पाणीही मुबलक आहे. यामुळे भोसरी दिघी, चऱ्होली, आळंदी भागातील नागरिक गेल्या चार दिवसांपासून कपडे धुण्यासाठी गर्दी करत आहेत. कपडे सुकविण्यासाठी नदीवरील पुलाचे कठडे, स्कायवॉक, दगडी घाटाचा वापर करत आहेत. आज दुपारपर्यंत कडक ऊन होते. परिणामी अन्य कपडे धुऊन होईपर्यंत आधीचे धुतलेले कपडे सुकून जात होते. यामुळे व्यावसायिक, लाँड्रीवालेही कपडे धुण्यासाठी इंद्रायणी घाटाला पसंती देत होते.
नदीपात्रात आधीच प्रदूषण आहे. मात्र आता प्रत्येकजण आपापल्या परीने अस्वच्छता करून नदी प्रदूषणात भर घालत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT