आळंदी, ता. १७ : विनापरवाना दारू विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी रिक्षाचालकासह महिलेवर आळंदी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १७) गुन्हा दाखल केला. सनी पोपट कांबळे (वय ३२, रा, लोहगाव पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना मरकळ येथील बागवान वस्तीवर एका हॉटेलच्या बाजूला घडली.
याबाबत फिर्याद पोलिस नाईक गणेश कारोटे यांनी दिली. बागवान वस्तीवर एक महिला दारू तयार करून विक्री करत असून, रिक्षाचालक सनी कांबळे याने पस्तीस लिटरचे एक असे पाच कॅन भरून दारू महिलेकडून घेत रिक्षाने (एमएच १२, व्ही डब्ल्यू १७०८) वाहतूक करत होता. दरम्यान, पोलिसांनी छापा मारला असता, रिक्षामध्ये एकशे पंच्च्याहत्तर लिटर दारू सुमारे साडेसतरा हजार रुपयांची घेऊन वाहतूक करत होता. पोलिसांनी दारूच्या कॅनसह सव्वा लाख रुपये किमतीची रिक्षा ताब्यात घेत सनी कांबळे आणि दारू तयार करून विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.