महावीर जन्मावर आधारित
आळंदीत नाटिका सादर
आळंदी, ता. १० : ‘‘भगवान महावीरांनी घालून दिलेल्या जीवनमुल्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार करून चालणाऱ्या साधुसंतांच्या त्यागावर जैन समाजाने जगभर प्रगती केली आहे. मेहनतीच्या जोरावर जैन समाजाने सर्व क्षेत्रात नाव कमावले,’’ असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी सांगितले.
श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आयोजित जैनांचे २४वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर यांच्या २६२४व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे व्याख्यान जैन स्थानक आळंदी येथे झाले. याप्रसंगी सुशील बहू मंडळाने महावीर जन्मावर आधारित नाटिका सादर केली. आनंद नवकार पाठशाळेतील मुलांनी जैन राष्ट्रगीत सादर केले. जैन धर्म ग्रंथावर गेम झोनच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या. यावेळी आळंदी नगरपालिकेचे अभियंता सचिन गायकवाड, आळंदी जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, महिला मंडळाचे अध्यक्षा सरला लोढा, सुशील बहू मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री चोरडिया, उपाध्यक्षा कल्पना रांका, आनंद नवकार पाठशाळेच्या तनुजा लुनावत, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक अप्पा बागल, शहर भाजप अध्यक्ष किरण येळवंडे, शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंदा मुंगसे, मदनलाल बोरूंदिया, मोहनलाल चोपडा, संघाचे विश्वस्त राजेंद्र धोका, रमेश नवलाखा, राजेंद्र चोपडा, प्रमोद बाफना, राजेंद्र लोढा, सागर बागमार, श्याम कोलन, सचिन बोरुंदिया, दिलीप नहार आदी उपस्थित होते.
यानिमित्ताने महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरातून सवाद्याच्या तालासुरात व नामजयघोषात आणि युवक युवतींच्या गरबा नृत्याने पार पडली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केले. महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले. आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, मच्छिंद्र शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. गौतम प्रसादीने उत्सवाची सांगता केली. श्रुती बोरूंदिया यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश वडगावकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.