पुणे

पालखी मार्गावर सुविधांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

CD

आळंदी, ता. २८ : पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिराबाहेरील परिसर मोकळा करावा. वारीसाठी येणाऱ्या भाविकांना तीर्थस्नानासाठी चांगल्या पाण्याची सोय म्हणून इंद्रायणीमध्ये दहा जूनपर्यंत वडिवळे अथवा अन्य धरणातून पाणी सोडावे. मागील वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये तरडगाव येथे चिखलामध्ये वारकऱ्यांना मुक्काम करावा लागला. पुन्हा अशी वेळ येवू नये यासाठी पालखी मार्गावर रस्ते आणि तळाची व्यवस्था दर्जेदार करण्याची मागणी आळंदी देवस्थानच्यावतीने प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजननाथ आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी (ता. २६) पुण्यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. १९ जूनला माउलींच्या पालखीचे प्रस्थान देउळवाड्यातून होणार आहे. २१ जुलैला पालखी पुन्हा पंढरपूरहून परत येणार आहे. दरम्यान १४ जूनपासून आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी आळंदीत दाखल होतील. शासनाकडून दर्शनव्यवस्थेसाठी पत्राशेड दर्शनमंडप पाणी, वीज, कॅमेरे या सुविधांसह उभारावी. १० जूनपर्यंत इंद्रायणीला धरणातून स्वच्छ पाणी सोडावे. प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिराच्या बाहेरील परिसर मोकळा करावा. १४ जून ते १९ जूनपर्यंत वारकऱ्यांसाठी आळंदीत किमान पंधराशे मोबाईल टॉयलेटची सोय असावी. प्रस्थान सोहळ्यासाठी आलेली दिंड्यांची वाहने १८ जुनपर्यंत थेट आळंदीत मुक्कामाच्या ठिकाणी सोडावीत. पोलिसांनी अडवणूक करू नयेत. थोरल्या पादुका येथे २० जूनला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते. यावेळी दिंड्यांची वाहने दिघीमार्गे फुलेनगरला सोडावीत. पालखी मार्गावर रथासोबत किमान वीस पोलिस तसेच सोहळ्यात सुरक्षिततेसाठी शेवटच्या दिंडीपर्यंत टप्प्याटप्प्याने पोलिस असावेत.
पालखी पुण्याहून सासवडकडे मार्गस्थ होत असताना वाटचालीत उरुळी देवाची वडकी नाला येथील पुलाची कामे पूर्ण करावीत. दिवेघाटात रस्ता रुंदीकरणामुळे डोंगराचे उत्खनन होत असल्याने वारी काळात डोंगरबाजूने नेट लावावी. सासवड पालखी तळाभोवती चिखल होवू नये यासाठी उपाययोजना करावी. जेजुरीमध्ये पालखी तळावरील सपाटीकरण करणे. वाल्हे येथील पालखी तळाच्या बाजूला रस्त्यालगत दुकाने लावू देवू नयेत. कापडगाव येथील बसस्टॉप हटवून रस्ता विस्तारीकरण करावे. फलटण येथे पालखी तळावरून दिंड्यांची वाहने बरडच्या दिशेने जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. बरड मुक्कामी दिंड्यांच्या जागेवर टॉयलेट उभारू नयेत. तळाचे विस्तारीकरण करावे. पाण्याची पुरेशी व्यवस्था पालखी तळावर असावी.

आळंदी देवस्थानच्या प्रमुख मागण्या
- आळंदीत इंद्रायणी नदीत स्वच्छ पाणी सोडावे.
- प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या दिंड्यांची वाहने त्यांच्या मुक्कामापर्यंत सोडावीत.
- दिेवेघाटात संरक्षणासाठी डोंगरकड्याच्या बाजूने जाळी लावावी.
- पालखी मार्गावरील उरुळी आणि वडकी येथील पुलाची कामे तातडीने करावीत.
- फुरसुंगी उरुळी येथील रस्त्यातील खड्डे तसेच साइडपट्ट्या डांबरीकरणाने पूर्ण भराव्यात.
- पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या तळाच्या जागेत तसेच मार्गावर दुकानांचे अतिक्रमण नसावे.
- पालखी मार्गावरील सुलभ आणि फिरते शौचालये स्वच्छ असावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs AUS 2nd T20I: २० चेंडूंत ९६ धावा! डेवॉल्ड ब्रेव्हिसचे विक्रमी शतक; ऑस्ट्रेलियाला झोडले, अनेक विक्रम मोडले Video

न्यू यॉर्कच्या इंडिया डे परेडसाठी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची निवड; सह-ग्रँड मार्शल म्हणून करणार भारताचं प्रतिनिधित्व

Latest Maharashtra News Updates Live: कृषी पंप चोरणारे चोरटे पकडले, ५ जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: ''अरुण गवळीचा पीए बोलतोय, ५ कोटी दे'', पुण्यात तोतया गँगचा पर्दाफाश, तिघेही बीडचे

Nashik Crime : नाशिकमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच; एका रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला

SCROLL FOR NEXT