आळंदी, ता. १ : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या टपरीच्या जवळून हिरो कंपनीची शाईन मोटरसायकल आणि रेडमी कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेला. याप्रकरणी चोरट्याभर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी (ता. ३१) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अरविंद बबनराव शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आळंदीजवळील चऱ्होली खुर्दमधील एका मंगल कार्यालयाजवळील पत्र्याच्या टपरीच्या जवळ असलेली मोटरसायकल (क्र. एम.एच. १४ के.सी. ९४४, अंदाजे किंमत ४० हजार रुपये), तसेच ५००० रुपये किमतीचा काळा रंगाचा रेडमी मोबाईल पॅंटच्या खिशातून चोरून नेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.