पुणे

आळंदीत मंगळवारपासून सहिष्णुता सप्ताह

CD

आळंदी, ता. १३ : संत ज्ञानेश्‍वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इंद्रायणी काठी जागतिक सहिष्णुता सप्ताह मंगळवार(ता. १७) पासून सुरू होत आहे. या निमित्ताने आषाढ वारी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना नामवंत कीर्तनकार गायकांचे कार्यक्रम अनुभवता येणार आहेत.
हा जागतिक सहिष्णुता सप्ताह विश्‍वशांती केंद्र माईर्स एमआयटी आणि आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने मंगळवार (ता. १७) ते गुरुवार (ता. १९) या काळात होणार आहे. या सहिष्णुता सप्ताहाचे उद्‍घाटन मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच ते सहा या दरम्यान विश्‍वशांती केंद्र माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्‍वनाथ कराड, डॉ. विजय भटकर, मंगेश कराड, सुनील कराड, राहुल कराड, स्वाती चाटे यांच्या उपस्थितीत होईल.
यामध्ये सकाळी साडेनऊ ते साडेअकरा ज्ञानेश्‍वर करंजीकर, जयेश भाग्यवंत, पोपट कासारखेडकर यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी दोन ते साडेचार अनिरुद्ध कारकर, अभिमन्यू पांचाळ, श्रेयस बडवे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अभंग वाणी तसेच गवळणीचा वारकरी सांप्रदायिक पद्धतीने कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सव्वा पाच ते सव्वा सहा उद्धव मंडलिक, तुकाराम दैठणकर यांचे प्रवचन होईल. संध्याकाळी सात ते रात्री नऊ जगन्नाथ पाटील, भगवती दांडेकर, चिदंबरेश्‍वर साखरे यांचे कीर्तन होईल. रात्री सव्वा नऊ ते साडे अकरा ज्ञानेश्‍वरी घाडगे, आसावरी बोधनकर, रघुनाथ खंडाळकर यांच्या संतवाणी, भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल. दरम्यान दररोज काकडा आरती हरिपाठ होईल. भजन आणि टाळ मृदंगाची साथ संगत एमआयटी हनुमान भजनी मंडळ विश्‍वदर्शन देवता भजनी मंडळ विश्‍वशांती दिंडी भजनी मंडळ करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT