पुणे

जवळच्या मार्गामुळे आळंदीत कोंडी

CD

आळंदी, ता. १२ : रखडलेले रस्ता रुंदीकरण, बेशिस्त वाहन चालक, अवजड वाहनांची लक्षणीय वाढ आणि मनमानी करणाऱ्या बस, रिक्षा चालकांमुळे आळंदीत प्रवेश करण्यापूर्वीच देहूफाटा चौकात वाहतूक कोंडी दुपारी चार ते रात्री नऊच्या दरम्यान नित्याचीच असते. पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी पाहता पुण्याहून ये-जा करणाऱ्यांनाही आता आळंदीतून जवळचा मार्ग वाटू लागला. यामुळे आळंदीत वाहनांची कोडी होत आहे.
पुणे पिंपरी चिंचवड शहरालगत आणि मरकळ धानोरे चाकण भोसरी शिक्रापूर औद्योगिक भागाशी जोडलेले शहर म्हणून आळंदीची ओळख आहे. आळंदी परिसरात बांधकाम क्षेत्रही विकसित झाल्याने मनुष्यबळ वाढले. परिणामी गाड्यांची संख्या वाढली. देवदर्शनाबरोबरच लग्नासाठी आलेल्या लोकांची गर्दी तसेच शनिवार, रविवार, गुरुवारी, एकादशीला विशेष असल्याने वाहतूक नित्याची ठरलेली आहे. अवजड वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने शहरातील अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. देहूफाटा येथून पिंपरी चिंचवड,
देहू भागातून मुंबईकडे जाण्यासाठी सोयीचा रस्ता आहे. तसेच पुण्याकडे जाण्याचा मार्ग असल्याने देहूफाटा चौकात सतत वाहतूक कोंडी होते. शहरात अवजड वाहने सोडल्याने वारंवार कोंडी होते.

येथे होते कोंडी
- भैरवनाथ चौक ते वडगाव रस्ता
- प्रदक्षिणा मार्ग
- पुणे-आळंदी रस्त्यावर विश्रामगृह ते वाय जंक्शन
- देहू फाटा ते एमआयटी महाविद्यालय
- आळंदी मरकळ रस्ता

समस्येची कारणे
- देहूफाटा काळेवाडी ते वाय जंक्शन रखडलेले रस्ता रुंदीकरण
- देहूफाटा ते एमआयटी महाविद्यालय परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले हातगाड्यांचे अतिक्रमण
- वाय जंक्शन येथील व्यापाऱ्याकडे खरेदी करण्यासाठी आलेल्या चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात
- बेशिस्त वाहनचालक
- आळंदी शहराला चक्राकार मार्ग नसल्याने अवजड वाहनांना शहराबाहेरून जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागते
- प्रवाशांना घेताना चालक बस रस्त्यावरच उभी करतात

उपाययोजना
- पुणे आळंदी रस्त्याचे आळंदी नगरपरिषद हद्दीतील रस्ता रुंदीकरण तातडीने होणे गरजेचे
- चाकण रस्ता देहूफाट्यावरून औद्योगिक भागात जाणाऱ्यांसाठी उड्डाणपुलाची गरज
- शहराला चक्राकार मार्गाची गरज.
- पिंपरी महापालिका हद्दीत डुडुळगाव ते केळगाव इंद्रायणीवरील पुलाचे रखडलेले बांधकाम जलद गतीने होणे आवश्यक
- देहूफाटा ते आळंदी स्मशानभूमी तसेच काळेवाडी ते आळंदी खंडोबामंदिर असा इंद्रायणीवर नवीन पूल बांधण्याची गरज
- आळंदी शहरात प्रदक्षिणा मार्गावर एकेरी वाहतुकीची गरज

आम्ही नियमीत देहूफाट्यावरून चाकण औद्योगिक भागात जातो. पुणे नाशिक महामार्गापेक्षा जवळचा आणि सुरक्षित मार्ग म्हणून प्रवास करतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने दुचाकीवरूनच जातो. मात्र आळंदीत आल्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. रात्री कामावरून जाताना चाकण आळंदीची वाहतूक कोंडी पार करता करता प्रवासातच दोन तास जातात. अवजड वाहनांचा आणि बसचालकांचा उपद्रव या मार्गावर दुचाकी चालकांना होतो. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
विकास कदम, कामगार, चाकण औद्योगिक परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT