पुणे

ज्ञानोबा-तुकोबा भेटीचा आज अलंकापुरीत सोहळा

CD

आळंदी, ता. १९ ः संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून यंदाच्या वर्षी दोन संतांच्या अनुपम भेटीचा सोहळा रविवारी (ता.३०) आळंदीत होत आहे. दोन्ही संतांच्या पालख्या आळंदीत येत असल्याने स्वागताची तयारी जय्यत सुरू आहे. पिठलं भाकरीपासून पुरणपोळीचे मिष्टान्न आणि रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांच्या पायघड्या टाकून दोन्ही पालख्यांचे स्वागत आळंदीकर आणि पंचक्रोशीच्या वतीने केले जाणार आहे.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, ‘‘दोन्ही संतांच्या पालखी सोहळे यापूर्वी २००८ मध्ये आळंदीत एकत्रित आले होते. त्यानंतर यंदा पुन्हा दोन्ही सोहळे आळंदीत येत आहे. या ऐतिहासिक घटनेत सहभागी होत स्वागताची संधी सर्वांना लाभणार आहे. दोन दिवस माउलींची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी (ता. २०) सकाळी पुण्याहून दहा वाजता आळंदीकडे मार्गस्थ होईल. सोहळा येरवडा, विश्रांतवाडी, दिघीमार्गे थोरल्या पादुका, धाकट्या पादुका अशा मार्गाने येईल. पालखी सोहळा सायंकाळी पाचच्या दरम्यान वेशीपाशी आल्यानंतर चोपदार माउलींच्या आगमनाचा निरोप देऊळवाड्यात देतील. माउलींना वेशीपाशी दहिभाताचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर पालखी सोहळा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होईल. नगरपालिका चौकात माउलींचा सोहळा आल्यानंतर रथातील पालखी खांदेकरी खांद्यावर घेत राममंदिर मार्गे हरिहरेंद्र स्वामी मठमार्गे देऊळवाड्यात आणतील. त्यानंतर समाजआरती होईल. दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा सोहळा सायंकाळी सातच्या सुमारास आळंदीत येईल. आळंदीत संत तुकाराम महाराजांच्या सोहळा देऊळवाड्यात आल्यानंतर समाजआरती होईल. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका माउलींच्या समाधीजवळ भेटीसाठी नेण्यात येतील. भेटीनंतर कारंजे मंडपात संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामी ठेवण्यात येईल.
दरम्यान, आळंदीत दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी वारकरी विद्यार्थी, आळंदीकर ग्रामस्थ असणार आहे. ठिकठिकाणी पालखी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सजविला जाणार आहे. स्वागतासाठी बॅण्डपथकही असणार आहे. प्रसाद म्हणून देवस्थानकडून पुरणपोळी तर आळंदीतील व्यापारी मित्र मंडळ, माऊली अन्नछत्र मंडळ तसेच ग्रामस्थांकडून पिठले भाकरी, पुलाव भात, शिरा प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

अवजड वाहतूक वळविणार
रविवारी (ता. २०) आळंदीत दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्यांचे आगमन होणार असल्याने पुणे भोसरीमार्गे आळंदीत येणारी सर्व प्रकारची जड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मरकळ धानोरे भागात जाणारी वाहतूक चऱ्होली बाह्यवळण मार्गाने तर चाकणहून येणारी वाहतूक काही काळ शेल पिंपळगावमार्गे वळविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

Latest Marathi News Live Update : पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

Market Today : MCX वर ट्रेडिंग ठप्प! गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Gastroenterologist warning: रिकाम्या पोटी अजिबात आंबट पदार्थांसह 'हे' 2 पदार्थ खाऊ नका, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली कारणे

SCROLL FOR NEXT