पुणे

चऱ्होली- आळंदी रस्त्यावर अपघाताचा धोका

CD

आळंदी, ता. २४ : चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा आळंदी बाह्यवळण रस्ता खड्ड्यामुळे धोकादायक बनला आहे. पुलावर मोठा खड्डा पडल्याने लोखंडी सळई उघड्या अवस्थेत दिसत आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तातडीने रस्ता दुरुस्तीबाबत कारवाईची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख ॲड. कुणाल तापकीर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, रस्त्यावर दोन किमीपर्यंत खड्डे, धूळ, कचऱ्याचे ढीग आणि पुलावर सुरक्षेच्या कोणत्याही सोयी नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिक येथे मासेमारीसाठी थांबतात आणि अस्वच्छतेला कारणीभूत ठरतात. पूल आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. पुलावर सुरक्षा जाळी बसवावी आणि नियमित स्वच्छता करावी. संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रवास सुरक्षित करावा. या गंभीर विषयाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून चऱ्होली आळंदी ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे. यावेळी युवासेना आळंदी शहर प्रमुख मनोज पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT