पुणे

सुवर्ण कलशासाठी एक कोटी रुपयांची देणगी

CD

आळंदी, ता. २५ : संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या ७५० व्या जन्मोत्सव महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी देवस्थानने संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या मंदिराच्या कळसाला गोकूळ अष्टमी आणि माउलींच्या जन्मदिनी अकरा किलो सोने बसविण्याचा संकल्प केला आहे. मुंबईतील भाविकाने एक कोटी रुपये सोन्याचा कळस बसविण्यासाठी दिल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्‍वस्थ चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.
कळसासाठी आत्तापपर्यंत एक किलो पन्नास ग्रॅम सोने आणि सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. सुवर्णकलशासाठी सोने देणाऱ्या पद्मिनी खरे कैकर या व्यावसायाने चार्टर्ड अकांऊटंट आहेत. त्या मुंबई येथे राहतात. वारकरी संप्रदायाचा वारसा असून त्यांच्या आई सोनोपंत दांडेकर यांच्या शिष्या होत्या. त्यांनी माउलींच्या मंदिरावरील सोन्याचा कळस बसविण्यासाठी एक कोटींचे एक किलो सोने दिले आहे.
अशिम अवंतिका फाउंडेशनच्यावतीने पंचवीस लाख, महेश पाटील यांनी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रूपये, रेखा पवार यांनी पाच लाख, उज्वला वाईकर यांनी चार लाख, विमल घुंडरे (आळंदीकर) यांनी तीन लाख, चंद्रकांत कुलकर्णी यांनी चार लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे सोने, नागनाथ गुंजाळ यांनी तीन लाख रुपयांचे सोने दिले आहे. याचबरोबर अनेक भाविक एक तोळे सोन्यापासून तर काही भाविक रोख रक्कम, धनादेश स्वरुपात आळंदी देवस्थानला सुवर्ण कलशासाठी योगदान देत आहेत. यामध्ये आळंदीकरांमधूनही देणगीचा ओघ सुरू आहे. अनेक आजी माजी पदाधिकारी नागरिक सोने तसेच रोख रक्कम देत आहेत. सुमारे बारा आळंदीकरांनी मदत केली आहे. गुरूवारी (ता. २४) आळंदीतील रहिवाशी पुष्पा कुऱ्हाडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त माउलींच्या मंदिराला सुवर्ण कलशासाठी एक लाख रुपयांची मदत केली. आत्तापर्यंत एक किलो पन्नास ग्रॅम सोने, ९३ लाख रुपये रक्कम स्वरुपात जमा झाले. असे दोन कोटींचे सोने रक्कम स्वरुपात मिळाल्याची माहिती चैतन्य महाराज कबिर यांनी दिली.

मदतीचा ओघ सर्वच स्तरावरून
माउलींचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा असून आळंदीतील मंदिरात पुढील महिन्यात मोठ्या स्वरुपात हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. कृष्ण जन्मााष्टमी आणि माउलींचा जन्मोत्सव १५ ऑगस्टला एकाच दिवशी येत असल्याने या दिवशी हा सुवर्ण कलश बसविण्याचा मानस आळंदी देवस्थानचा आहे. या निमित्ताने आळंदी देवस्थानने केलेल्या आवाहनानुसार मदतीचा ओघ सर्वच स्तरावरून सुरू आहे. या आधी देवस्थानने चांदीची पालखी आणि मुख्य समाधी गाभाऱ्याला चांदीचे आवरण तसेच पंखा मंडपात चांदीचा दरवाजाही बसविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT