आळंदी, ता. ३१ : आळंदीतील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी विद्युत रोषणाई बरोबरच विविध मंदिराच्या कलाकृती सादर करत देखावे साकारले आहेत. यामध्ये राजे ग्रुप तर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग प्रभावीपणे उलगडणारा हा देखावा गणेश भक्तांचे खास आकर्षण ठरत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने अलौकिक कृती घडवून आणल्याचे प्रसंग मराठी संतसाहित्य आणि लोककथांमधून प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या प्रसंगाचे दर्शन राजे ग्रुपने या देखाव्यातून घडवले आहे. विद्युत सजावट, ध्वनी-प्रकाश योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साकारलेला हा देखावा सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.
याचबरोबर नगरपरिषद चौकातील जय गणेश ग्रुपच्या वतीने केलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मंडळाने यंदा रौप्य महोत्सवानिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा अप्रतिम देखावा साकारला असून, तो भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे. विद्युत रोषणाई, आकर्षक रंगसंगती, संगीतामुळे हा देखावा अवघ्या आळंदीकरांसह येथील भाविकांसाठी भक्तिमय अनुभव देतो आहे. महाकालेश्वर मंदिराचा गाभारा, शिखर, प्रवेशद्वार आणि परिसर अगदी हुबेहूब साकारला असून, मंदिराच्या मूळ रचनेची अचूकता पाहून नागरिकांना आनंद होत आहे. जय गणेश प्रतिष्ठानने कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.