पुणे

आळंदीत आज ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन

CD

आळंदी, ता. ३० : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून आळंदी पोलिस ठाण्यातर्फे ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन आज (ता. ३१) करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेला देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकजुटीच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी धावण्याची सुरुवात ज्ञानेश्वर विद्यालयातून होणार असून घुंडरे आळी, प्रदक्षिणा रोड, नवीन पूल, देहू फाटा चौक, चाकण चौक ते ज्ञानेश्वर विद्यालय असा तिचा मार्ग असेल. या उपक्रमात आळंदी पोलिस ठाण्यासोबतच पंचक्रोशीतील सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालय, खेळाडू, सेवाभावी संस्था, गणेश मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, शांतता कमिटी, पोलिस मित्र सहभागी होणार आहेत. आळंदीतील व्यापारी, कामगार व नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आळंदी पोलिस ठाणे व ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: पाकिस्तानचा नवा पोरखेळ! आता म्हणतायेत PSL भारतात दाखवणार नाही...

EPFO Interest Rate : अलर्ट! PF वरील व्याजदर घटणार? कमाईवर होणार थेट परिणाम; जाणून घ्या अपडेट

Viral Video: लिफ्ट बिघडली तरी लोक बाहेरच निघेना! दादर स्टेशनवरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून 'ठेंगा'? आराखडाच सादर न झाल्याने अर्थसंकल्पात नाशिकची उपेक्षा

Latest Marathi News Live Update :बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र

SCROLL FOR NEXT